मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या ही सरकार स्पॉन्सर्ड होती का असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसंच एक महिना उलटल्यानंतरही दाभोळकरांचे मारेकरी अजून मोकाट असल्याची नाराजीही राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
   जादूटोणाविरोधी माहिती देणा-या सचित्र पुस्तिकेचं प्रकाशन कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. यावेळी दाभोळकरांचे मारेकरी अजूनही मोकाट असल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
     सरकार सगळ्याच गोष्टींचा तपास सीबीआयकडे सोपवते मग पोलिसांनी काय करायचं असा सवालही राज ठाकरेंनी सरकारला विचारला. पोलीस सक्षम असतानाही त्यांच्यावर विश्वास का दाखवला जात नाही असंही ते म्हणाले.
      तसेच दाभोळकरांच्या हत्येच्या तपासासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याची टीका राज यांनी यावेळी केली.
     २० ऑगस्ट रोजी पुण्याच्या ओंकारेश्वर पुलाजवळ डॉ. दाभोळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी दाभोळकरांच्या दोन संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्र जारी केली आहेत. मात्र त्यापैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.
 
Top