नळदुर्ग -: शहरातील मुलतान गल्‍ली येथे अंतर्गत रस्‍त्‍यावर नागरिकांनी अतिक्रमण केल्‍याने ये-जा करणा-या पादचा-यांना नाहकच त्रास सहन करावा लागत असून नगरपालिकेने तात्‍काळ अतिक्रमण मुक्‍त रस्‍ता करुन रस्‍ता तयार करुन देण्‍याची मागणी ऑल इंडिया मजलिस इत्तेदाहुल मुसलमीन संघटनेच्‍यावतीने करण्‍यात आली आहे.
      नळदुर्ग येथील प्रभाग क्रमांक तीन मधील मुलतान गल्‍ली येथील नजीर बागवान यांच्‍या घरापासून ते शेख फकीरसाब यांच्‍या घरापर्यंत येण्‍याजाण्‍याच्‍या रस्‍त्‍यावर काही नागरिकांनी पुर्णपणे अतिक्रमण केले आहे. त्‍याचबरोबर अतिक्रमण धारकांनी घरातले साहित्‍य व भांडे रोडवर आणुन ठेवल्‍याने रस्‍ता बंद होऊन त्‍याचा पादचा-यांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी हा रस्‍ता मोठा होता मात्र अतिक्रमणामुळे दुचाकीसुध्‍दा जाऊ शकत नाही. आजारी असलेल्‍या नागरिकांना दवाखान्‍यास घेऊन जाण्‍यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. कारण अतिक्रमणामुळे दुचाकी किंवा अन्‍य कसल्‍याही प्रकारचे वाहन रुग्‍णांच्‍या घरापर्यंत जाऊ शकत नाही. त्‍याकरीता रस्‍त्‍यावरील अतिक्रमण तात्‍काळ दुर करुन रस्‍ता मोकळा करुन देण्‍याची मागणी ऑल इंडिया मजलिस इत्तेदाहुल मुसलमीनचे नळदुर्ग शहराध्‍यक्ष अ.रजाक अ.रहेमान कुरेशी यांनी निवेदनाद्वारे नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी यांच्‍याकडे केली आहे.
फोटो : नळदुर्ग शहरातील मुलतान गल्‍ली येथे अंतर्गत रस्‍त्‍यावर झालेले अतिक्रमण दिसत आहे.
 
Top