नळदुर्ग -: येथील जय हनुमान तरुण गणेश मंडळाच्‍यावतीने यंदाच्‍या गणेश उत्‍सवामध्‍ये उत्‍तराखंड महाप्रलयंकारी दुर्घटनेचे हुबेहुब दृश्‍य देखाव्‍यातून आकर्षकपणे सादर केले आहे. हा देखावा पाहण्‍यासाठी बालचमूसह गणेश भक्‍त व नागरीक मोठी गर्दी करीत आहेत.
    नळदुर्ग येथील शास्‍त्री चौकातील जय हनुमान गणेश मंडळाने उत्‍तराखंडच्‍या महाप्रलयंकारी दुर्घटनेच्‍या देखाव्‍यातून आगळ्यावेगळ्या त-हेने सादर केले आहे. या देखाव्‍यात उत्‍तराखंडच्‍या महाप्रलयात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या भाविकांना श्रध्‍दांजली, लेक वाचवा देश वाचवा, आरोग्‍य सेवा याबाबत जनजागृती करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. स्‍त्रीभ्रूण हत्‍या विरोधी व इतर विषयावर फलक लावले आहे. तर ढगफुटीने प्रचंड जलप्रलय, जमीनदोस्‍त झालेली घरे, दळणवळण, रस्‍ते, आकर्षक विदयुत रोषणाई आदींचा यात समावेश आहे. मंडळाचे अध्‍यक्ष महेश घोडके, उपाध्‍यक्ष बाळू वाघमारे, शंकर वाघमारे, दयानंद घोडके, विजय दस, मल्‍लू कांबळे, डी.एस. वाघमारे, सरदारसिंग ठाकूर, मारुती घोडके, बलदेव ठाकूर, पिंटू घोडके, शाम कनकधर, अरुण ठाकूर, राजू ठाकूर, किरण ठाकूर यांच्‍यासह मंडळाचे कार्यकर्ते देखावा करण्‍यासाठी घेतले आहे.
 
Top