बार्शी : भारतरत्न डॉ.मोगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमनंतरच्या बैठकीत बार्शी शहरातील सिव्हील इंजिनिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी विलास नकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शिवाचार्य कॉम्प्लेक्स येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमापूजनानंतर मनोगते व्यक्त करण्यात आली. बार्शी शहराच्या भौगोलिक परिस्थितीनुसार शहराचे सौंदर्य वाढावे तसेच भविष्यातील रहदारीच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या वास्तू असाव्यात, बार्शी नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध स्थापत्य योजनांची माहीती सांगून यापुढे महाराष्ट्रात बार्शीचे नांव चांगल्या नियोजनासाठी प्रसिध्द व्हावे यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावे असे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे ङ्कावळते अध्यक्ष प्रदिप देशमुख यांनी नूतन अध्यक्षपदी विलास नकाते यांच्या नावाची घोषणा केली. इतर पदाधिकारी असे : उपाध्यक्षपदी जयंत देशमुख, सचिव अमर काळे, खजिनदार प्रशांत देशपांडे, सदस्य - भारत बारवकर, कल्याण देशपांडे, सारंग कुलकर्णी, महेश नांदेडकर, अभिजीत कुलकर्णी, गिरीष टेपाळे, राजेंद्र होनराव, प्रशांत हिरे, वाघमारे, दिपक गरड, मनिष रुगले, संदेश भोंडे यांसह इतर सदस्य उपस्थित होते.