उस्मानाबाद :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मंगळवार दि.17 सप्टेंबर रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सकाळी 9 वाजुन 5 मिनीटांनी होणार आहे. तत्पुर्वी जिल्हाधिकारी आवारातील हुतात्मा स्तंभास सकाळी 8 वाजुन 50 मिनीटांनी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण केले जाणार आहे.
नागरीकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी 8 वाजून 40 मिनीटापुर्वी स्थानापन्न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता, जिल्हा परिषद येथे जिल्हापरिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजुन 15 मिनिटांनी आणि नगर परिषद उस्मानाबाद येथे नगराध्यक्षा रेविता बनसोडे यांच्या हस्ते सकाळी 7 वाजुन 50 मिनिटांनी ध्वजारोहण होईल