उस्मानाबाद -: तृतीय पंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी व उन्नतीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, तेव्हा जिल्ह्यातील तृतीय पंथीयांनी जास्तीत जास्त आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत डॉ. के. एम. नागरगोजे बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शिल्पा करमरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी वैभव सुर्यवंशी, तहसीलदार सुभाष काकडे, बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) आर. बी. काटकर, नगर विकास प्रशासनाचे प्रकल्प संचालक श्री. कुर्वलकर आदिची उपस्थिती होती.
तृतीय पंथीयांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी व त्यांच्याबद्दल सहानभूती ठेवून सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रात प्रथमच आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याचे डॉ.नागरगोजे यांनी सांगितले.
तृतीय पंथीयांनी आपले जीवनमान उंचावून समाजात विश्वास निर्माण करुन एक आदर्श निर्माण करावा. तृतीय पंथीयांनी जास्तीत जास्त नोंदणी करुन आपले गट तयार करावेत. त्यांच्या हाताला काम देण्यासाठी प्रशिक्षणाची सोयही करण्यात येईल, बँकेमार्फत त्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन प्रत्यनशील आहे. तृतीय पंथीयांनी छोटे-छोटे लघुउद्योग करुन आपले जीवन सन्मानाने जगावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.नागरगोजे यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.नागरगोजे यांच्या हस्ते उस्मानाबाद तालुक्यातील नऊ तृतीय पंथीयांना आरोग्य विभागामार्फत ओळखपत्र, शिधापत्रिका, आधार कार्ड वाटप करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून मतदान यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी रितसर अर्ज भरुन घेण्यात आले. प्रशासनाच्या या पुढाकाराबदद्ल नवजीवन तृतीयपंथी असोसिएट्स संघटना, उस्मानाबादच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस विभागाकडून महिला पोलीस श्रीमती माया दामोदरे व श्रीमती राणी चव्हाण यांनी केलेल्या कार्याबद्दलही त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
तृतीय पंथीयांच्या गटाला घरकुल वाटप, शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देणे, आरोग्य विभागाकडून ओळखपत्र देणे, आधार कार्ड देणे, शिधापत्रिका वाटप, मतदान यादीत नाव समाविष्ट करण्याबाबतच्या तांत्रीक अडचणी तात्काळ दुर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी संबंधित यंत्रणेला या बैठकीत दिल्या.
तृतीय पंथीयांनी नोंदणीसाठी उपजिल्हाधिकारी (सामान्य), शिल्पा करमरकर- दुरध्वनी क्र.02472-225618, उप विभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर-(02472-227624), जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी वैभव सुर्यंवशी (02472-228592), नवजीवन तृतीय पंथी असोसिएट्स संघटना, उस्मानाबाद दत्ता श्रीरंग पंगुडवाले (लता)- भ्रमणध्वनी क्रमांक-9320844902 या क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी यावेळी केले. प्रास्ताविक वैभव सुर्यवंशी यांनी केले.