उस्मानाबाद :- जिल्हा स्टेडियम, परभणी येथे राज्यस्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धा दि. 21 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अँथेलिटिक्स संघटनेच्या मान्यतेने व परभणी जिल्हा अँथलेटिक्स संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली आहे.
      खुला गट पुरुष राज्यस्तरीय बक्षिस- स्पर्धेत प्रथम 55 हजार 555 रुपये, व्दितीय 25 हजार 555, तृतीय 15 हजार 555, चौथे बक्षिस 10 हजार 555, पाचवे बक्षिस 5 हजार 555 आणि सहावे उत्तेजनार्थ रोख बक्षिस तर 16 ते 20 वर्ष मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय बक्षिस प्रथम- 15 जार 555 रुपये, व्दितीय 10 हजार 555, तृतीय 7 हजार 555 , चौथे 5 हजार 555 व सहावे उत्तेजनार्थ रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.
       खेळाडुंनी स्पर्धेसाठी दि.20 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी गणेश पवार, क्रीडा मार्गदर्शक (मैदानी) यांच्याशी भ्रमणध्वनी  क्रं. 9970095315 व रणजित काकडे-9423444467 स्पर्धा संयोजक, परभणी या क्रमांकावर संपर्क करावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक,  खेळांडुनी याची नोंद घ्यावी.                                                
 
Top