उस्मानाबाद :- शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता निश्चित केली आहे. या पदासाठी बारावी (एच. एस. सी. किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण) असणे आवश्यक आहे. विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी शिफारस केलेल्या परंतु शैक्षणिक पात्रता पुर्ण करु न शकणा-या उमेदवारांची यादी शासनाने osmanabad.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली आहे.
वरील पदासाठी अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी बारावी एच एस सी परीक्षा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असल्याचा पुरावा व अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे 20 सप्टेंबर पुर्वी सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.