उस्मानाबाद :- जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक,  खेळांडु तसेच तालुका संयोजकांना  सूचित करण्यात येते की,  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 14,17 व 19 वर्षाखालील  मुलां व मुलींच्या स्पर्धा येथील श्रीतुळजा भवानी स्टेडियम, उस्मानाबाद येथे  दि. 24 ते 25 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले  आहे.
    या स्पर्धा पुर्वी 26 व 27 सप्टेंबर मध्ये घेण्यात येणार होती. काही  तांत्रिक कारणामुळे या स्पर्धा  आता 24 व 25 सप्टेंबरला घेण्यात येतील. या  बदलाची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top