उस्मानाबाद :- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने 28 वा नेत्रदान पंधरवाडयानिमित्त नेत्रदान कॅन्डललाईट जनजागरण रॅलीचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक धाकतोडे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी डॉ. टी. एच. माने, डॉ. सचिन देशमुख, डॉ. प्रदिप छंचुरे, डॉ. आर. पी. वाघमारे उपस्थित होते. कॅन्डललाईट रॅली मेणबत्तीच्या प्रकाशाप्रमाणे आपण देखील नेत्रदान करुन अंध व्यक्तिीच्या जीवनात प्रकाश निर्माण करावा, असे आवाहन डॉ.धाकतोडे यांनी केले. नेत्रदान पंधरवाडा दि 8 सप्टेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
या रॅलीत जिल्हा रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थींनी व वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ही रॅली जिल्हा रुग्णालय ते काळा मारुती चौक, ताजमहाल टॉकिज -शिवाजी चौक्, आंबेडकर चौक-संत गाडगेबाबा चौक, लेडिज क्लब ते जिल्हाधिकारी निवासस्थान या मार्गाने काढण्यात आली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ. पी. जी. पाटील यांनी नेत्रदानाचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. मिलिंद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मुस्तफा पल्ला, डॉ. ज्योती कल्याणी, के. बी. गुंड, बी. एम. घाडगे, अयुब शेख, संदिप उंदरे, उमेश गोरे, किरण बारकुल, सचिन हिवरे, अधिसेविका विमल पानसे व परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील सर्व शिक्षक, रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
यावेळी किरण मोरे, नितीन कांबळे, शेळके, सुनिल निकम, मुंडे, अमोल व्हट्टे, नागेश पाटील, दीपक गायकवाड यांचेही सहकार्य लाभले.