बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत झालेल्या मागणीवर बोलतांना सोलापूर जिल्हा पोलिस अधिक्षक राजेश प्रधान यांनी डि.जे. अथवा डॉल्बीला प्रतिबंध असून कोणत्याही सबबीवर परवानगी मिळणार नाही व कायद्याचे उल्लंघन करणा-यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे सुनावले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतांना व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन करतांना शनिवार रोजी बार्शीतील पोलिस ठाण्यातील नियोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बार्शी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सालार चाऊस, पोलिस उपाधिक्षक रोहिदास पवार तसेच विविध गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्रधान यांनी म्हटले, प्रत्येक मंडळाच्या पदाधिकार्यांनी आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या टिम तयार करुन दररोज दोघाजणांनी मंडपामध्ये रात्रीचा मुक्काम करुन आपल्या देखाव्यांची व श्रींच्या देखभालीची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. पोलिसांच्या टेहळणी पथकाकडून दररोज रात्रीच्या गस्तमध्ये प्रत्येक मंडळाचा आढावा घेण्यात येणार असून आपल्या कर्तव्यात कसूर करणार्या मंडळांना पुढील वर्षी परवानगी देण्यात येणार नाही. त्यांच्याकडून लेखी घेतल्याशिवाया यापुढे कसल्याही प्रकारची परवानगी मिळणार नाही. अशा निष्काळजी मंडळांच्या पदाधिकार्यांमुळे काही वेळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा संभव असतो. टिळक यांनी ज्या उद्देशाने अथवा समाज प्रबोधन होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवास प्रोत्साहन दिले तोच उद्देश सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षीत आहे. डॉल्बीचा आग्रह धरण्यात काहीच अर्थ नाही याचे कारणही डॉल्बीच्या समोर १० मिनीट जरी थांबले तरी आपल्या आयुष्याची ५ वर्षे कमी होतील इतक्या शरीरास विघातक अथवा अपायकारक लहरी त्यातून बाहेर येतात. हृदयाच्या रोग्याचा तर जीवही जाऊ शकतो. आपल्या पारंपारिक वाद्य अथवा कमी आवाजातील सुमधुर वाद्यांनी आपल्या शिस्तप्रिय मिरवणुका निघणे अपेक्षित आहे. बार्शी शहरातील पुतळा पार्क ही चांगली संकल्पना असून त्यामुळे बार्शीचे नाव अनेक ठिकाणी चांगल्या अर्थाने घेतले जाते. डॉल्बीची पाश्चात्य संस्कृती असल्याने अशा प्रकाराने काही वर्षाने आपणास पुढच्या पिढीस लेझीमचे चित्रीकरण दाखवून अशा प्रकाराला लेझीम म्हणतात असे म्हणण्याची वेळ येईल. स्त्री-भृणहत्या, महिलांवरील अत्याचार, दुष्काळ, निसर्गावरील आघात, संस्कृती अशा जिवंत प्रश्नावर समाजप्रबोधन करण्यासाठी गणेशोत्सवातून साध्य होते. गणेशोत्सव काळात महिलांची छेडछाड, चेन स्क्रॅशींग इत्यादी गोष्टी होऊ नये म्हणून मंडळांच्या स्वयंसेवकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. बेवारस वस्तू अथवा संशयास्पद व्यक्तींबाबत त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.