बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मौजे बळेवाडी (ता.बार्शी) येथील शेतजमीन संगणमताने तोतयागीरी करुन हडप करण्यासाठी जमीन विक्रीचे खोटे व बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक बलदोटासह ६ जणांवर बार्शी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की, सौ. सुलभा विश्वनाथ परिचारक (वय ५२ रा. २६३३ उमदे गल्ली पंढरपूर हल्ली मुक्काम भडकंबा ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी) यांची शेतजमीन गट नं २/१ मधील ८ गुंठे जमीनीचे संगनमताने बनावट दस्त तयार करुन दि.१० मे २०१३ रोजी फसवणूक केली. सदरची बाब लक्षात आल्यावर जमीनीचे मालक सौ.सुलभा परिचारक यांनी बार्शी पोलिसांत रितसर फिर्याद दिली आहे. जमीनीचे बनावट दस्त तयार करणारे विणा विष्णु घाडगे (रा. बारबोले प्लॉट, बार्शी), रमाकांत रामचंद्र चौधरी (सुभाष नगर,बार्शी), राजेंद्र देविदास आगावणे (रा. ढगे मळा, बार्शी) एम.बी. बलदोटा (सहाय्यक दुय्यङ्क निबंधक वर्ग-१), आत्‍माराम मोहन चव्हाण (जावळे प्लॉट, बार्शी), पोपट साहेबराव परबत (बारंगुळे प्लॉट, बार्शी) यांच्याविरुध्द ४२०, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे बार्शी पोलिसांत बनावट दस्त तयार करुन फसवणुक करण्याचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास महिला पो.उ.नि. सौ.सुरेखा धस या करित आहेत.
 
Top