कळंब -: कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील एका शेतक-याने कर्जाला कंटाळून आपल्या स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, या बाबतचे सविस्तर वृत असे कि कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील शेतकरी भास्कर धोंडीराम बेडके ( वय ६५ वर्ष ) यांनी कळंब येथील एका खाजगी पतसंस्थेचे तीन लाख रुपये कर्ज काढले होते, मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे जमीन नापीक झाली आणि काढलेल्या कर्जाची परतफेड होऊ शकत नसल्यामुळे त्यांनी दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी भाटशिरपुरा मंगरूळ शिवारातील गट नं. ६८० मधील स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मधुकर भास्कर बेडके (वय ३८) रा. भाटशिरपुरा ता. कळंब जि. उस्मानाबाद यांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो. हे. कॉ. बाबुराव चव्हाण हे करत आहेत.