नळदुर्ग :
येथील उर्दु शाळेत उघडकीस आलेल्या शालेय पोषण आहार धान्य व साहित्य
साठयाच्या गैरप्रकारानंतर अनेक संस्थेच्या शाळेसह जि. प. शाळेतल्या शालेय पोषण
अहाराबाबत संशय निर्माण झाले आहे. तर सय्यद अब्दुलशहा मेमोरियल उर्दु शाळेचे संस्थापक
व मुख्याध्यापक यांच्या आरोप-प्रत्यारोपाने विदयार्थी व पालक हैराण झाले
असुन याप्रकरणी लवकरच दोषीविरुध्द कारवाई
न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नळदुर्ग येथिल ऑल इंडिया मजलिस
इत्तेदाहुल मुसलमीन संघटनेचे शहराध्यक्ष अ.रजाक अ.रहेमान कुरेशी यांनी दिला आहे.
नळदुर्ग
शहरातील सय्यद अब्दुल्ला शहा मेमोरियल
उर्दू ही शाळा सुरु होवुन जवळपास तीन दशकापेक्षा आधिक कालावधी उलटले
आहे. त्यामुळे शहारातील ही एक नामांकीत शाळा म्हणुन या शाळेकडे पाहिले जात असतानाच
याठिकाणी शालेय पोषण अहाराचे धान्यसाठा करुन गैरप्रकार होत असल्याची घटना उघडकीस आली . याप्रकरणी संस्थाचालक व शाळेचे
कर्मचारी यांच्यातील वाद विदयार्थी व पालकासमोर उघड झाले आहे. संस्था चालक व
कर्मचा-यानी विदयार्थ्याना दर्जेदार
शिक्षण देवुन शैक्षणिक गुण्वत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र या शाळेत
विदयार्थ्यांच्या पोषण आहारावर डोळा ठेवुन गैरप्रकार करीत असतना घटना उघडकीस आल्याने या शाळेत संस्थाचालक व
शिक्षकानी शिक्षणाचे कसे तीन तेरा वाजविले यांची चर्चा नागरिकात होत आहे.
नळदु्र्ग
येथिल हुतात्मास्मारकासमोर असलेल्या सय्यद अब्दुल्ला शहा मेमोरियल उर्दु
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती महेबुबी अ.रजाक शेख यांनी शालेय पोषण अहार पंचायत समिती
तुळजापूरचे अधिक्षक गुरव एस .आर याना लेखी
देताना सांगितले की, संस्थचालकामध्ये
भांडण व तक्रार असल्यामुळे आपण कोणताही निर्णय घेवु शकत नाही, यापुर्वी या शाळेचे
तीन मुख्याधपकानी राजीनामा दिले आहे. त्याचबरोबर सन 2005 मध्ये शाळा स्थलांतर
करण्यात आली , तेव्हा तांदुळ साठा शिल्लक
होता. त्या तांदुळाचा संपुर्ण साठा
अपणाला कोणतीही कल्पना न देता या शाळेच्या दोन खोल्यामध्ये आणुन ठेवले, किती
ठेवले यांची माहिती नाही , आपणाविरुध्द कट रचुन संस्थाचालक मला फसविण्याचा
प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. दरम्यान
शाळेत पटावर बोगस विदयार्थी संख्या जास्त असल्याने हा तांदुळ साठा शिल्लक राहिल्याचे समजते . संस्थेचे प्रा. जावेद काझी व अहमद
हुसेन, कुरेशी यांनी म्हटले आहे की, शाळेत पोषण आहाराबाबत जी घटना घडली आहे त्याला
शाळेच्या मुख्याध्यापिका व शालेय समितीचे माजी अध्यक्ष जबाबदार असल्याचे म्हटले
आहे.
या गैरप्रकारास जबाबदार फक्त शाळेच्या
मुख्याध्यापिकेला जबाबदार धरले जाते. कारण शाळेतच इतक्या मोठया प्रमाणात विदयार्थ्यांचा
पोषण आहार ठेवलेला असताना संस्थेच्या पदाधिका-यांनी याबाबत वेळीच मुख्याध्यापिकेवर
कारवाई का केली नाही, आज शाळेच्या मुख्याध्यापिका महेबुबी शेख यांनी म्हटले
आहे की, शाळेत अतिरिक्त ठरणा-या शिक्षकांना वाचविण्यासाठी संस्थाचालकांच्या दबावामुळे
व त्यांच्या सांगण्यावरुन मोठया प्रमाणात बोगस विदयार्थ्यांची नावे दाखल करुन
घेतले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जर शाळेत मुख्याध्यापिकेच्या म्हणण्यानुसार
बोगस विदयार्थ्यांची नावे असतील तर ही बाब अतिशय गंभीर असून या प्रकरणाला शाळेबरोबरच
शिक्षण विभागाचे अधिकारीही तितकेच जबाबदार
आहेत. कारण दर दोन तीन महिन्यात शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी शाळेला भेट असते.
शाळेला भेट दिल्यानंतर त्या संबंधित अधिका-यांनी पोषण आहाराबरोबरच शाळेत बोगस
विदयार्थी आहेत का याचीही तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र चहा, नाष्टा देऊन वर
एखादे पाकीट दिले की शाळेला भेट देणारे अधिकारी शाळेत कुठलीच तपासणी व चौकशी न
करताच निघून जात असल्याने आज शाळेत अनेक गैरप्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. शासनाने
शाळेतील बोगस विदयार्थी शोधून काढण्यासाठी शाळेत पटपडताळणीचा उपक्रम राबविले
असले तरीही या उर्दू शाळेत जास्त विदयार्थी बोगस कसे आहेत, यामागे काय दडलंय याचा
शोध घेणे गरजेचे आहे. संस्थाचालकांनी शाळेत
बोगस विदयार्थ्यांची नावे घालण्यास सांगितले असून या बोगस विदयार्थ्यांचा पोषण
आहार शिल्लक असल्याचे आज बोलले जात आहे. मात्र असे असले तरी वेळीच दक्ष होवून
शाळेच्या मुख्याध्यापिकेने सदरील बाब उघड करुन दर महिन्याला येणारा पोषण आहार कमी
करुन घेणे गरजेचे होते. गटशिक्षणाधिकारी सविता
भोसले यांनी या उर्दू शाळेला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी नेमकी कशाची तपासणी
केली , हे शाळेच्या कर्मचा-याना व त्यांनाच माहित, याप्रकरणाची चौकशी होणार की
राजकीय दबाव तंत्राचा वापर होणार याबाबत नागरिकात होत आहे नाही. आठवीपर्यंत एकूण 459 विदयार्थी आज हजेरी पटावर
आहेत. यातील बोगस विदयार्थी किती आहे हे पाहणे शिक्षण विभागाच्या अधिका-यांचे काम
आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका व शालेय समितीचा
माजी अध्यक्ष जबाबदार असल्याचे संस्थेचे प्रा. जावेद काझी व अहमद हुसेन कुरेशी
यांनी म्हटले आहे.