उस्मानाबाद :- राज्य परिवहन उस्मानाबाद विभागात अभियांत्रिकी पदवीधर, पदविकाधारक, हि'शोब तपासणीस, मॅकॉनिक मोटार व्हॅईकल, मोटार व्हेईकलबॉडी बिल्डर व अँटो इलिक्ट्रीशिय या व्यवसायात शिकाऊ उमेदवार म्हणून एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती समक्ष, शुक्रवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद यांनी दिली आहे.
पात्र उमेवारांना सदर मुलाखतीस उपस्थित राहण्याबाबत त्यांच्या राहत्या घरच्या पत्यावर मुलाखतपत्र पाठविण्यात आले आहे. आय. टी. आय उत्तीर्ण व सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्र व त्यांच्या प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रतीसह राज्य परिवहन विभागीय कार्यालय, डॉ.आंबेडकर पुतळा,उस्मानाबाद येथे हजर रहावे. मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची व्वसायनिहाय यादी त्याच कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येईलअसेही कळविण्यात आले आहे.