उस्मानाबाद - राज्यातील ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयात गैरन्यायीक सदस्य पदाच्या नियुक्ती/ पुर्ननियुक्तीने जागा भरण्यात येणार असून या पदासाठी विहीत नमुन्यात अर्ज जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद, यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, उस्मानाबाद येथील कार्यालयात उपलब्ध आहेत.
     अर्जाची  किंमत 100 रुपये असून इच्छुकांनी आपले परिपुर्ण  भरलेले अर्ज  13 नोव्हेंबर पर्यत पाठवावेत. अर्ज करण्याविषयीची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद यांनी केले आहे.                                     
 
Top