उस्मानाबाद : जिल्हा परिषद, उस्मानाबादअंतर्गत्स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व परिचर वर्ग-4 या पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या पदाचे प्रवेशपत्र 21 ऑक्टोबर पासून ऑनलाईन डाऊनलोड करण्याची सुविधा Osmanabad.nic.in वर सुरु करण्यात आली आहे.
        सदरील प्रवेशपात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन डाऊनलोड करुन घ्यावे तसेच परिक्षेकरीता उमदेवारांनी काळ्या शाईचा पेन व पॅड सोबत आणावेत, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.    
 
Top