उस्मानाबाद :- जिल्ह्यातील सर्व शाळा /महाविद्यालयाचे प्राचार्य/ मुख्याध्यापक/ क्रीडा शिक्षक/ खेळाडु/ क्रीडा संघटनेला सूचित करण्यात येते की, जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय महिला मैदानी स्पर्धा येथील श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,उस्मानाबाद येथे 15 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व संबंधितानी याची नोंद घेवून आपले खेळाडू वेळेवर उपस्थित ठेवावेत. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख गणेश पवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संजीव कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे