उस्मानाबाद :- हवामानावर आधारीत पथदर्शक पिक विमा योजना रब्बी ज्वारी व हरभरा या पिकांसाठी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली असून सन 2013-14 मध्ये रब्बी ज्वारी व हरभरा पिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत भरण्याच्याच्या मुदतीत 31 ऑक्टोबर पर्यत वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत अवेळी पाऊस, तापमान कमी/जास्त व आर्द्रता या घटकापासून समाविष्ट पिकांना होणाऱ्या नुकसानीसाठी 25 हजार रुपयापर्यंत संरक्षण मिळणार आहे.शेतकऱ्यांनी विमा हप्ता म्हणून ज्वारी व हरभरा पिकासाठी 500 रुपये प्रतिहेक्टरी बँकेत जमा करुन पिक संरक्षित करावे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित कृषी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व राष्ट्रीयीकृत बॅंकेशी संपर्क साधावा.