उस्मानाबाद :- केंद्र शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभाग व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यावतीने आयोजित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे 19 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणात उद्योजकता कशी रुजवावी, लघु उद्योग ते उत्पादन उद्योगाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. कच्या मालाची माहिती, एमआयडीसी मधील भूखंड, उद्योगाला लागणारे परवाने, उद्योगाची निवड, प्रकल्प अहवाल तयार करणे,बँकींग संबंधी माहिती, व्यक्तीमत्व विकास, प्रभावी संभाषण कौशल्य, नाबार्डच्या विविध कर्ज योजना, जिल्हा उद्योग केंद्र व खादी गा्रमोद्योगाच्या विविध योजना, सुक्ष्म, लघु,व मध्यम उद्योग मंत्रालय ( भारत सरकार) यांच्या योजना, आदी विषयांवर तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन लाभणार आहे.
         या प्रशिक्षणासाठी पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेले 18 ते 35 वयोगटातील युवक-युवतींना अर्ज  करता येतील. अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक एस.एस.गायकवाड (भ्रमणध्वनी क्र. 9011219701)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कनिष्ठ प्रकल्प अधिकारी एमसीईडी द्वारा जिल्हा उद्योग केंद्रश्‍सेंट्रल बिल्डींग समोर, उस्मानाबाद यांनी केले आहे.  
 
Top