उस्मानाबाद : 19 वर्षांपूर्वी धुळे येथे झालेल्या खासगी ट्रॅव्हल्स अपघातप्रकरणी उस्मानाबाद येथील प्रवाशास नुकसानभरपाई देण्याचे आदेश धुळे येथील मोटार न्यायाधिकरणाने दिले होते. याप्रकरणी आदेशानंतर 11 वर्षांनंतर हायकोर्टातील लढाई जिंकून सदरची नुकसानभरपाई मिळविण्यात तक्रारदारास यश आले आहे.
उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार भारत गजेंद्रगडकर 14 एप्रिल 1994 रोजी औरंगाबाद येथून हमसफर ट्रॅव्हल्सने लग्नकार्यासाठी इंदोरला निघाले होते. यावेळी सदरील बसला धुळे येथे अपघात झाला. यामध्ये गजेंद्रगडकर यांना जबर मार लागून उजवा पाय फ्रॅक्चर झाला. याप्रकरणी नुकसानभरपाई मिळावी म्हणून त्यांनी धुळे येथील मोटार न्यायाधिकरणकडे तक्रार केली. याप्रकरणी सुनावणी होऊन 18 जुलै 2002 रोजी ट्रॅव्हल्स कंपनीस दोषी ठरवून गजेंद्रगडकर यांना 20 हजार रुपये देईपर्यंत व्याजानुसार नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. मात्र, प्रत्येक वेळी ट्रॅव्हल्स कंपनीने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. हे प्रकरण पुढे औरंगाबाद न्यायालयात वर्ग झाले. तेथेही विविध कारणे देत कंपनीने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. यावरून ट्रॅव्हल्स कंपनीवर जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात आदेश झाल्यानंतर कंपनीने नुकसान भरपाईचा 54 हजार 587 रुपयांचा धनादेश न्यायालयात जमा केला. त्यानंतर सदरची रक्कम गजेंद्रगडकर यांना घटनेच्या 19 वर्षांनंतर प्राप्त झाली. याप्रकरणी अँड. वाकुरे व अँड. बाराते यांनी बाजू मांडली.