अक्कलकोट : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना अक्कलकोट तालुक्यातून मताधिक्य देऊन देशाचे पंतप्रधान होण्याची संधी द्या, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. अक्कलकोट तालुका काँग्रेस पक्षातर्फे आयोजिलेल्या हैद्रा येथे गावभेट दौर्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, अक्कलकोट तालुका पंचायत समिती सभापती विमल गव्हाणे, जिल्हा परिषद सदस्य महेबुब मुल्ला, शिवराज बिराजदार, रामचंद्र अरवत, अक्कलकोट काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, सातलिंग शटगार, अरुण जाधव, जंगले गुरुजी, माजी नगराध्यक्ष मलगोंडा, सातपुते सर आदी उपस्थित होते. प्रारंभी हैद्रा येथील सैपन मुलूख खाजासाब दर्गा येथे दर्शन घेऊन गावभेट दौर्यास प्रारंभ केला.
म्हेत्रे बोलताना म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सोलापूर विद्यापीठ, पुणे- सोलापूर रस्ता चौपदरीकरण, एनटीपीसी प्रकल्प, बोरामणी विमानतळ, संगारेड्डी हायवे, पॉवरग्रीड, मेडिकल कॉलेज अशी असंख्य कामे केली असून, मुख्यमंत्री असताना भरघोस निधी देऊन तालुक्याचा विकास केला आहे. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी काँग्रेसने केलेल्या कामाची माहिती दिली. येत्या 25 तारखेपर्यंत मतदारांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन केले. या वेळी सदस्य महिबूब मुल्ला व सुवर्णा मलगोंडा यांनी मनोगत व्यक्त केले. या गावभेट दौर्यात मराठवाडी, गुरववाडी, नाविंदगी, गौडगाव, कडबगाव, जेऊरवाडी आदी गावांस भेट देऊन ग्रामस्थांनी चर्चा केली. गावभेट दौर्यात स्वामीराव पाटील, वकील भावान, भीमाशंकर कापसे, बसवराज हिप्परगी, महेश जानकर, माळप्पा पुजारी, सैफन मुजावर, बसवराज दरगोंडा, शशिकांत कळसगोंडा, बसवराज बिराजदार मलकप्पा करुटे, नागप्पा देवरमणी, सायबण्णा अलकुडे, शिवानंद स्वामी, रामचंद्र बडूर, संजय लच्चाणे, मलप्पा रामपुरे आदी उपस्थित होते.