तुळजापूर : जळकोट (ता. तुळजापूर) येथे रविवार दि. 27 ऑक्‍टोबर रोजी श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व आत्मा प्रकल्‍पाच्‍या वतीने शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
    या शेतीविषयक कार्यशाळेचे उदघाटन उस्‍मानाबाद जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या हस्ते होणार असून तुळजापूर तालुका कृषी अधिकारी डी. आर. जाधव, आत्माचे प्रकल्प संचालक व्ही. डी. लोखंडे आदीजण उपस्थित राहणार आहेत. तर लातूरचे डॉ. सचिन कुलकर्णी, बी. पी. सूर्यवंशी  डॉ. रविंद्र आडे, डॉ. रत्नाकर कांबळे, सुनिता बोळेगावे आदीजण मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत शेतकर्‍यांनी मोठ्या संख्‍येनी सहभागी व्हावे, असे आवाहन अविनाश राठोड, सविता कुलकर्णी, मेघराज किलजे यांनी केले आहे.
 
Top