राजकोट - कसोटी असो किंवा टी-20... भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमने-सामने येतात तेंव्हा प्रत्येक लढतीत वेगळा रोमांच चाहते अनुभवतात. कट्टर प्रतिस्पर्धी झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेची सुरुवात गुरुवारी टी-20 सामन्यापासून होईल. ऑस्ट्रेलियन टीम सात वनडे आणि एकमेव टी-20 सामना खेळण्यासाठी भारत दौ-यावर आहे. दोन्ही संघांनी बुधवारी कसून सराव केला. टीम इंडियात पुनरागमन करणा-या युवराजसिंगच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील.
ऑस्ट्रेलियाचा संघ युवा खेळाडूंनी सजलेला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्यांचा नियमित कर्णधार मायकेल क्लार्क भारत दौ-यावर येऊ शकलेला नाही. संघाची मदार अनुभवी खेळाडू शेन वॉटसन आणि ब्रेड हॅडिन यांच्यावरच असेल. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व जॉर्ज बेली करीत आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत बेलीचा नेतृत्वाचा अनुभव दांडगा आहे. दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत सात वेळा टी-20 सामना झाला आहे. यात ऑस्ट्रेलियाने चार वेळा, तर भारताने तीन वेळा विजय मिळवला. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत बोलायचे झाल्यास तो दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करीत आहे. चॅम्पियन्स लीगच्या माध्यमाने त्याने आपला फॉर्म कायम ठेवला आहे. टीम इंडियात पुनरागमन झाल्याने युवराजसिंग सर्वाधिक रोमांचित झालेला आहे. शानदार प्रदर्शन करून संघातील आपली जागा निश्चित करण्यासाठी तो जोरदार प्रयत्न करील. युवीने राजकोट येथे पोहोचून सर्वात आधी सरावाला सुरुवात केली. युवी आक्रमक फलंदाजीशिवाय फिरकीतही मदतगार ठरू शकतो. घरच्या मैदानावर सौराष्ट्राचे जयदेव उनादकट आणि रवींद्र जडेजाचासुद्धा दमदार प्रदर्शन करण्यासाठी सज्ज आहेत.
ऑस्ट्रेलियात संघात मोठे नाव असलेल्या खेळाडूंची संख्या कमी आहे. मात्र, तरीही कांगारूंची टीम लढाऊ बाण्याची आहे. शेन वॉटसन, जॉर्ज बेली, ब्रेड हॅडिनशिवाय टी-20 मध्ये सर्वाधिक वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम करणारा अॅरोन फिंच आकर्षणचा केंद्रबिंदू असेल. याशिवाय डावखुरा फलंदाज फिलिप ह्यूजसुद्धा मॅच विजेता प्रदर्शन करू शकतो. ऑस्ट्रेलिया संघात नीक मेडिनसन या आक्रमक फलंदाजाचा समावेश झाला आहे. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स लीगचा अनुभव असलेले चार खेळाडू ऑस्ट्रेलिया संघात आहेत. मॅक्सवेल, वॉटसन, नॅथन कुल्टर नील आणि फ्युकनर यांनी चॅम्पियन्स लीगमध्ये सहभाग घेतला होता.
फलंदाजी आणि गोलंदाजीत टीम इंडिया संतुलित आहे. फलंदाजीत शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, युवराजसिंग, रवींद्र जडेजा विजयासाठीची कामगिरी करण्यात सक्षम आहेत. गोलंदाजीत भारताची मदार आर. आश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा आणि युवराजसिंग यांच्यावर असेल. भारतीय खेळपट्ट्या फिरकीला मदतगार ठरतात. वेगवान गोलंदाजीत भुवनेश्वरकुमार, ईशांत शर्मा शिवाय मोहंमद शमी, जयदेव उनादकट आणि विनयकुमार यांच्यापैकी दोघे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतात.