सोलापूर -: पदवीमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून शैक्षणिक वर्ष 2013-14 मध्ये MBA, MCA व B.ed या अभ्यासक्रमामध्ये प्रथम वर्षामध्ये शिकत असलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याबाबत विहित नमुन्यात अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 20 नोव्हेंबर 2013 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.
अर्जाचा नमुना व त्यासोबत लागणा-या कागदपत्राचे विवरण हे www.desw.gov.in या संकेत स्थळावर व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त माती सैनिक/ युध्द विधवा/ दिवंगत माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी कॅप्टन सुनिल मो. गोडबोले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.