महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी राज्यात विविध ठिकाणी पर्यटन संकुले बांधली आहेत. तथापी, पर्यटन विकासाच्या संदर्भात निश्चित केलेल्या सर्वच ठिकाणी महामंडळाने स्वत: किंवा खाजगी संस्थेच्या विद्यमाने पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करुन देणे आर्थिक आणि प्रशासकीयदृष्ट्या शक्य होत नाही कारण ब-याच ठिकाणी पर्यटकांचा ओघ बहुधा पर्यटन हंगामात असतो किंवा वर्षातील काही महिन्यापुरताच असतो, त्याचा परिणाम म्हणजे राज्याच्या अंतर्भागात असलेली पर्यटन संकुले, तेथे एकुण केलेली गुंतवणुक आणि देखभाल करण्याचा खर्च लक्षात घेता व्यापारीदृष्टया किफायतशीर होत नाहीत. त्याचबरोर जे पर्यटन शहरापासून दूर असलेल्या पर्यटनस्थळास जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी राज्यातील पर्यटन क्षेत्रातील छोट्या गावांमध्ये पर्यटकांसाठी एक तर जागा उपलब्ध नाहीत किंवा फार थोड्या प्रमाणात उपलब्ध असून पर्यटकांना समाधान देऊ शकणारी निवास व्यवस्था अपुरी आहे. यासाठी निवास आणि न्याहारी योजना संपूर्ण महाराष्टात राबविली जात आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये - राज्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. विविध धार्मिक स्थळे, ऐतिहासिक महत्वाच्या जागा, अभयारण्ये या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वळण्याची शक्यता आहे. ब-याच ठिकाणी बंगले, घरे व फ्लॅट्स कोणीही रहात नसल्याने रिकामे पडून आहेत किंवा अशा जागांचा उपयोग निवासासाठी पूर्णपणे आणि कायमस्वरुपात घरमालकांकडून केला जात नाही. काही घरमालक आपले घर, बंगले किंवा काही खोल्या विद्यार्थ्यांना काही काळाकरीता पेंईंग गेस्ट तत्वावर देतात. अशा प्रकारचे पर्यटन क्षेत्राजवळील बंगेले/ घर/ वाडे की जे बाराही महिने निवासासाठी वापरले जात नाहित किंवा बंद ठेवले जातात अशा निवास व्यवस्थेचा पर्यटकांसाठी उपयोग करुन घेता येईल, विशेषत: ज्या ठिकाणी पर्यंटकांचा ओघ फक्त काही हंगामापुरता असतो, अशा ठिकाणी पेंईंग गेस्ट योजनेच्या धर्तीवरच इच्छुक घरमालकाने आपल्या स्वत:च्या घरात पर्यटकांसाठी 2-6 खोल्या उपलब्ध करुन द्याव्यात तसेच स्वखर्चाने भोजनाची व्यवस्था करावी अशी याची कल्पना आहे.
योजनेत सहभागी होणा-या घरमालकास होणारे फायदे - एक म्हणजे स्थानिक घर मालकांच्या रिकाम्या जागेचा फायदेशीर उपयोग होऊन त्यांना साधारण 1000 ते 15000 रुपये मिळून स्वयंरोजगार निर्माण होईल व पर्यटकांसाठी किफायतशीर पध्दतीवर स्वच्छ राहण्याची आणि भोजनाची घरगुती सोय उपलब्ध होईल. दुसरा फायदा म्हणजे पर्यटकांना मालकांसमवेत राहून स्थानिक संस्कृती, राहणीमान, चालीरीती आणि खाद्यपदार्थ यांची चांगल्या प्रकारे ओळख होईल. इच्छुक घरमालकाने अधिक माहितीकरीता तहसील कार्यालयात संपर्क साधावा तसेच www.maharashtratourism. gov.in या वेबसाईटवरसुध्दा सर्व माहिती उपलब्ध आहे तरी स्थानिक घरमालकाने या योजनेचा लाभ घ्यावा.

- जिल्हा माहिती कार्यालय,
सोलापूर द्वारा प्रसृत
सोलापूर द्वारा प्रसृत