लातूर :-  प्रायोगिक तत्वावरील हवामानावर आधारित पथदर्शक फळ पिक विमा योजना लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड व परभणी जिल्ह्यात केळी या फळपिकासाठी, हिंगोली जिल्ह्यात संत्रा व केळी या फळपिकासाठी लागू केली आहे. या योजनेचा जास्तीत शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, लातूर विभाग, लातूर यांनी केले आहे.
       या योजनेअंतर्गत सन 2013-14 या हंगामात विमा प्रस्ताव बँकेत भरण्याची अंतिम तारीख कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना केळी या पिकासाठी दि. 31 ऑक्टोबर, 2013 आणि संत्रा या पिकासाठी दि. 30 नोव्हेंबर, 2013  ही आहे.
       शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी 6 हजार रुपये प्रति हेक्टरी, संत्रा (आंबिया बहार) पिकासाठी 3 हजार 600 रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे बँकेत भरुन पिक संरक्षित करावे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधावा.
 
Top