लातूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा प्रमुखांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या अंध, मूकबधीर, अपंग, ऑटिझम ग्रस्त व बहुविकलांग , अध्ययन क्षमता व थॅलेसिमिया हे आजार असलेल्या विद्यार्थ्यांना सवलती मिळणार आहेत. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदन पत्र मंडळाकडे सादर करावे, असे विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांनी आवाहन केले आहे.
अंध विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी परीक्षा कालावधीत प्रत्येक तासाला 20 मिनिटे जादा वेळेची सवलत, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जवळचे परीक्षा केंद्र, आकृत्या व नकाशे काढण्यात सवलत, विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा लेखी ऐवजी तोंडी घेण्याची सवलत, गणित (71) व सामान्य गणित (74) ऐवजी अंकगणित (76) व कार्यानुभवाचा एक विषय घेण्याची सवलत, अंध विद्यार्थ्यांना एक टप्पा खालील वर्गातील लेखनीक घेता येईल.
मूकबधीर विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास जादा वेळेची सवलत, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जवळचे परीक्षा केंद्र, गणित (71) व सामान्य गणित (74) ऐवजी अंकगणित (76) व कार्यानुभवाचा एक विषय घेण्याची सवलत, तीन भाषांऐवजी कोणत्याही स्तरावरील एक भाषा, संयुक्त भाषा व उर्वरित दोन भाषांऐवजी कार्यानुभवाचे दोन विषय घेण्याची मुभा असल्याची सवलत देण्यात येणार आहे .
अपंग विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास जादा वेळेची सवलत, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जवळचे परीक्षा केंद्र, लेखनिकाची सवलत देण्यात येणार आहे.
बहुविकलांग विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी दीड तास जादा वेळेची, लेखनिकाची, विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा लेखी ऐवजी तोंडी देण्याची सवलत देण्यात येणार आहे. स्वतंत्र बैठक व्यवस्था, नकाशा, आराखडे, काढण्यापासून, गणित (71) व सामान्य गणित (74) ऐवजी अंकगणित (76) व कार्यानुभवाचा एक विषय घेण्याची सवलत देण्यात येणार आहे.
अध्ययन अक्षमता विद्यार्थ्यांना पेपरच्या निर्धारित वेळेव्यतिरिक्त प्रतितास 15 मिनीटे जादा वेळ देण्यात येईल. मागणीनुसार व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केल्यास लेखनिक देण्यात येईल. स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येईल. डिसलेक्शिया व डिसक्राफिया हे वैगुण्य असलेल्या विद्यार्थ्यांना दोन भाषा अनिवार्य व तृत्तीय भाषेऐवजी कार्यानुभव विषय घेण्याची मुभा देण्यात येणार आहे. तथापि, इयत्ता दहावीनंतरचे पुढे उच्च शिक्षण घ्यावयाचे असल्यास इंग्रजी भाषा विषय घेणे अनिवार्य आहे. डिसकॅल्कुलिया हे वैगुण्य असलेल्या विद्यार्थ्यांना गणित (71) व सामान्य गणित (74) ऐवजी अंकगणित (76) आणि कार्यानुभवाचा एक विषय घेण्याची मुभा आहे.
ऑटिझमग्रस्त (स्वमग्न) विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार जवळचे केंद्र, संगणक वापरण्याची परवानगी देण्यात येईल, मात्र संगणकावर पूर्वीची कोणतीही माहिती असणार नाही. कॅल्क्यूलेटर हा कॅल्क्यूलेटर स्वरुपात पाहिजे. विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा लेखी ऐवजी तोंडी घेण्याची सवलत देण्यात येणार आहे. ऑटिझम या अपंगत्वासाठी मुंबई येथील नायर हॉस्पिटल अथवा सायन हॉस्पिटल अथवा पुणे येथील ससून हॉस्पिटल किंवा ते शक्य नसल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
थॅलेसेमिया आजार असलेल्या विद्यार्थ्यांना पेपरच्या निर्धारित वेळे व्यतिरिक्त प्रति तास 20 मिनिटे जादा वेळ देण्यात येईल. जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जादा वेळेकरिता सादर करणे आवश्यक आहे.
अंध, अपंग, मूकबधीर, बहुविकलांग, अध्ययन क्षमता, ऑटिझम ग्रस्त व थॅलेसेमिया आजार असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शाळेत शिकवला न जाणारा कार्यानुभव, समाजसेवा, उपयोजित कला, औद्योगिक कलेची मुलतत्वे या गटातील विषय तसेच अन्य प्रात्यक्षिकाचे विषय त्यासाठीचे शिक्षण देणाऱ्या व शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, तंत्रशिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या संस्थेत शिकता येईल. तसेच त्यांना अनुग्रह गुणांची जास्तीत जास्त 10 टक्के मर्यादा वाढवून 20 गुणांपर्यंत राहील. ही सवलत घेतलेल्या एकूण विषयापैकी फक्त तीन विषयापुरतीच मर्यादित असेल.
मंडळाच्या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या उपरोक्त प्रमाणे अपंग विद्यार्थ्यांच्या शाळा प्रमुखांनी अशा संस्थांकडून संबंधित विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थेत विषयाचा निर्धारित केलेला अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मंडळास सादर करावे.
शाळा प्रमुखांनी मंडळाकडे प्रस्ताव पाठवितांना मंडळाने विहित केलेल्या प्रपत्रात तसेच वैद्यकीय दाखल्यात अपंगत्वाची टक्केवारी नमूद करुन सदर प्रपत्रातील सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे. अपंगत्व स्पष्टपणे दिसेल असा वैद्यकीय अधिकाऱ्यांने प्रमाणित केलेला विद्यार्थ्यांचा पोस्ट कार्ड आकाराचा पूर्ण शरीराचा मूळ फोटो प्रस्तावासोबत सादर करावा . शाळा प्रमुखांची देय सवलतीपैकी कोणतीही सवलत सदर विद्यार्थ्यास पाहिजे, अशी सुस्पष्ट शिफारस आवश्यक आहे. विद्यार्थी कार्यानुभव विषय गटातील विषय पर्यायी म्हणून अभ्यासणार असेल तर विषयाचे नाव व त्याचा सांकेतिक क्रमांक स्पष्टपणे नमूद करावा .
लेखनिक मंजूर करण्याचे अधिकार मंडळाच्या पूर्व परवानगीने संबंधित परीक्षा केंद्र प्रमुखांचे आहेत. उमेदवारास लेखनिकाची आवश्यकता असल्यास संबंधित शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे आवश्यक कागदपत्रासह परीक्षेपूर्वी प्रस्ताव सादर करुन मंडळाची मंजुरी घेणे अनिवार्य राहील. मंडळातर्फे बैठक व्यवस्था प्राप्त झाल्यावर संबंधित केंद्रप्रमुखांकडे लेखनिकाचे नांव, शैक्षणिक अर्हता, प्रमाणित केलेला फोटो इत्यादीसह पत्र पाठवून लेखनिक मंजूर करुन घेणे आवश्यक आहे.
मंडळाच्या असे निदर्शनास आले आहे की, विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रात अपंग विद्यार्थ्यांच्या संदर्भातील सांकेतिक क्रमांकाची नोंद केली जाते. परंतु वैद्यकीय दाखल्यासह मंडळाकउे आवश्यक तो प्रस्ताव पाठविला जात नाही, अथवा वैद्यकीय दाखल्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुस्पष्ट शिफारस नसते, अथवा प्रस्तावामध्ये निश्चित कोणत्या सवलती विद्यार्थ्यास पाहिजेत याचा उल्लेख नसतो, अनेक त्रुटी असतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याची याची योग्य ती नोंद घेवून वरील सर्व संबंधित बाबींची वेळीच पूर्तता करण्यात यावी. त्याचप्रमाणे अस्थिव्यंग या विद्यार्थ्यांना प्रस्ताव आणि वैद्यकीय दाखल्यानुसार फक्त्शारिरीक शिक्षण या सक्तीच्या विषयातून सूट मिळू शकते. यामुळे अशा विद्यार्थ्यांस व इतर अपंग गटातील विद्यार्थ्यांना मंडळ नियमानुसार वैकल्पिक व इतर सर्व शालेय विषय अभ्यासणे अनिवार्य असून या विषयातील श्रेणी मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.
अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमात व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या योजनेत असलेल्या सवलती इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना देखील आपल्यास्तरावर देण्यात याव्यात .
सोबत जोडलेल्या वैद्यकीय दाखल्याच्या आवश्यक त्या छायांकित प्रती काढून कार्यवाही करण्यात यावी. यापुढे सदर परिपत्रक व वैद्यकीय प्रमाणपत्राचे नमुने मंडळातर्फे आपणास पाठविले जाणार नाहीत. ते कायम संग्रही ठेवावेत.
आपल्या शाळेतील संबंधित सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आवश्यक ती माहिती वेळीच देण्यात यावी व त्यानुसार संबंधित केंद्रसंचालक / मुख्याध्यापक यांनी योग्य ती कार्यवाही करावी. उपरोक्त सवलतीपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.
संबंधित विद्यार्थी प्रथम प्रयत्नात अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षार्थी म्हणून प्रविष्ठ होताना सवलत आवश्यक असल्यास पूर्वीच्या प्रयत्नाचे वेळी सवलत मंजूर केलेल्या पत्राची प्रमाणित झेरॉक्स प्रत मंडळास परीक्षेचे आवेदनपत्र भरतेवेळीच सादर करावीत .