बार्शी : बार्शी-सोलापूर रोडवरील रेल्वे उड्डान पुलावरील खराब रस्त्यामुळे कांद्याने भरलेल्या टेंपोच्या स्टेअरिंगचा दांडा तुटल्याने टेंपो दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले आहेत.
    अनिल चंद्रकांत साडेकर आणि बाळू सुभाष साडेकर (दोघेही रा.परंडा) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. गुरुवारी दि. १७ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास सदरचा अपघात झाला आहे. टेंपो क्र.एङ्क.एच.०४ ए.जी. ७४२८ या वाहनातून कांद्याचा माल भरुन दोघेही सोलापूरच्या दिशेने जात होते. उड्‌डान पुलावरील खराब रस्त्याने झालेल्या खड्‌ड्यामुळे सदरचा अपघात झाला आहे. येथील खाजगी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरु आहेत.
 
Top