मुंबई : चंद्रपूर, सांगली, नाशिक या जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील गावे, तांडे, वस्ती मध्ये मराठी माध्यमाच्या 36 माध्यमिक शाळा विशेष बाब म्हणून अनुदान तत्वावर सुरु करण्यात काही अटींच्या अधीन राहून मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यातील सीमालगत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मराठी भाषिकांची लोकसंख्या व विद्यार्थी संख्येच्या मानाने मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याची पुरेशी सोय उपलब्ध नसल्यामुळे या भागात रहाणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर माध्यमाच्या शाळांतून शिक्षण घ्यावे लागत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे.
एकही माध्यमिक शाळा नसल्याने राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये माध्यमिक शाळांची आवश्यकता आहे आणि प्रती तुकडी किमान 20 इतकी पटसंख्या उपलब्ध आहे अशा 36 गावांमध्ये मराठी माध्यमाच्या नवीन माध्यमिक शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. या माध्यमिक शाळा खासगी शैक्षणिक संस्थामार्फत सुरु करता येणार असून, शाळांना विशेष बाब म्हणून प्रथम वर्षापासून 20 टक्के अनुदान दिले जाईल. त्यानंतर मूल्यांकन निकषानुसार पात्र ठरल्यास प्रतिवर्षी टप्पा अनुदान सुत्रानुसार वेतन अनुदान देय होईल. विहित कार्यपध्दती व निकषानुसार पात्र ठरणाऱ्या शाळांची यादी संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येणार असून शासनस्तरावरुन संस्थांना शाळा सुरु करण्यासाठी प्रथम हेतूपत्र (Letter Of intent) व तद्नंतर परवानगी (Letter Of Approval) देण्यात येईल.
सीमावर्ती भागातील 36 माध्यमिक शाळांची ठिकाणे पुढीलप्रमाणे :-
चंद्रपूर जिल्हा : तालुका- जिवती- गांवे- गुडशेला, पल्लेझरी; तालुका- कोरपना- गांवे- लखमापूर, वनसडी, परसोडा, गोविंदपुर; तालुका- राजुरा- गावे- भुरकुंडा (खुर्द), नलफडी, पाचगांव, धोपटाळा; तालुका- गोंडपिंपरी-गावे- सालेणरी, सुपगांव.
सांगली जिल्हा : तालुका-जत- गावे- वजवाड, सिध्दनाथ, धुळकरेवाडी, सिंदुर, गुगवाड, खोजनवाडी, तिकोंडी, भिवगी, जाडरबोबलाद, सोनलगी, सुसलाद, तिल्हाळ, खंडनाळ, यलदरी, पांडोझरी, दरीकोणूर, साळमळगेवाडी, मोटेवाडी (तु.आ.) हळळी, पांढरेवाडी, करेवाडी (कोबो).
नाशिक जिल्हा : तालुका-पेठ- गांव-राजबारी, तालुका- सुरगणा; गांव- देवलदरी, गावांचा समावेश आहे.
हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 201308081749126621 असा आहे.