प्रतिकात्‍मक फोटो
बार्शी : बार्शी पोलिसांनी मटका बुकी चालकांवर कारवाई केली असून कॉंग्रेसचे नगरसेवक सोमनाथ रमाकांत पिसे, (रा. सुभाष नगर), महेश अरविंद यादव (रा. रोडगा रस्ता), जिलाणी गुलाम हनुरे, (रा. महेदी नगर) या तिघांवर प्रतिबंधक कारवाई केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक डाके यांनी वरील तिघांवर कारवाई केली.
    वरील आरोपी सातत्‍याने सहका-यांच्‍यामार्फत मुंबई कल्‍याण मटका चालत असल्‍याचे गुन्‍हे बार्शी पोलिसांत दाखल झाल्‍याने सदरची कारवाई केल्‍याचे तसेच यांसह आणखी बुकीचालकांचा शोध सुरु असून त्‍यांच्‍यावरही कारवाई करण्‍यात येईल, असे पोलीस निरीक्षक यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
 
Top