बीड (सोमनाथ खताळ) -: सध्या गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंत फक्त मराठा आरक्षण हाच मुद्दा जोर धरत आहे. आज प्रत्येक ठिकाणी राजकीय पक्ष आपल्या मार्गदर्शनाखाली मोर्चे, आंदोलणे, धरणे, रास्तारोको असे कृत्य हजारो सर्वसामान्ङ्म नागरीकांना घेऊन करतात. प्रत्येक राजकारणी व सामाजि कार्ङ्मकर्ता आपल्या भाषणात किंवा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात जाहीर सांगतो की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचा जाहीर पाठींबा आहे. प्रत्येकाचाच आरक्षण मिळावे ङ्मासाठी पाठींबा आहे तर मग नेमके घोड आडतयं कुठं? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आरक्षणासाठी लढत असताना आरक्षणापेक्षा आपल्या पाठीमागे जास्तीत जास्त जनता कशी उभी राहील यासाठी राजकारण्यांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसत आहे. या राजकारण्यांनी फक्त भाषणे ठोकुन आरक्षण मिळत नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष काहीतरी कृती आवश्यक असल्याचेही काही सुजान नागरीकांमधुन बोलले जात आहे.
बीड जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अगदी सर्वसामान्यापासुन ते मंत्र्यापर्यंत सर्वच रस्त्यावर उतरत आहेत. मराठा समाजाची चालु काळात अतीशय गंभीर परिस्थिती असून आत्महत्या करणा-या शेतक-यांपैकी ९५ टक्के शेतकरी हे मराठा समाजाचेच आहेत, एवढेच नाही तर ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण घेऊनदेखील जास्त घरी बसणा-या सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या जास्त ही मराठा समाजाचीच आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेत १९ मंत्री व १६० आमदार हे मराठा समाजाचे आहेत. मग आरक्षण देणा-यांची संख्या ही जास्त मराठयांची आहे. तर मग मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही? असा हा एक प्रश्न येथे उपस्थित होतो. तसे पाहिले तर बीड जिल्ह्यात सुद्धा दोन मंत्र्यासह दोन खासदार व डझनभर आमदार आहेत. प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री हे सर्व आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपला पाठींबा असल्याचे सांगतात. एवढेच नाही तर आता बरेच जण तर आरक्षणापेक्षा स्वता:ला जास्त प्रसिद्धी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. २०१४ ची लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्ष आपल्या चेल्यांना कामाला लावत आहेत.
काय म्हणतात हे चेले आपल्या भाषणात

वडवणी येथील कृती समितीने मराठा आरक्षणासाठी आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात माजी राज्यमंत्री आ. प्रकाश सोळंके म्हणाले होते की, मराठ्यांनो कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर संघर्ष करावा लागतो, जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करा, फक्त निवडणुका आल्या म्हणुन लढु नका तर आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष करत रहा.
आपल्या नेहमीच्याच भाषण शैलीत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आर.टी. देशमुख यांनी आपले परस्पर विरोधी आ. सोळंक हे आपले परस्पर विरोधी आ. सोळंके हे मार्गदर्शक असल्याचे जाहीरपणे सांगितले, त्यांनी जर आदेश दिले तर आपण सर्वांना घेऊन मंत्र्यांच्या गाड्या फोडु, रक्त सांडु पण आरक्षण मिळवुच असे सांगीतले. मात्र हा त्यांच्या आपले आ. सोळंके यांना तोंड दाबुन बु्क्क्याचा मार दिला. आपला विरोध सर्वांसमोर जाहिर केला.
हे राजकारणी फक्त मराठा समाजाच्या तरुणांचा राजकारणात वापर करुन घेत आहेत. जिजाऊ ब्रिगेडच्या हातात सत्ता द्या, मराठ्यांना लगेच आरक्षण देऊ ,असे जिजाऊ ब्रिगेडच्ङ्मा कङ्कल निंबाळकर हे म्हणतात.
राजकीय पक्षाचं खायचे दा वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांनी आरक्षणासंदर्भात राजकारण न करता लवकरात लवकर आरक्षण द्यावे, असे भाषण छावाचे गंगाधर काळकुटे हे करतात.
कुठलाही जहागीरदार असो आम्ही त्याला घाबरत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नसल्याचे अशोक हिंगे सांगतात.
आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नारायण राणे व शरद पवार यांना भेटणार असल्याचे संदीप क्षीरसागर बोलताना सांगतात.