उस्मानाबाद : उस्मानाबादेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणा-या १२ वर्षीय मुलीला ती घराकडे परतत असताना टमटममध्ये तिच्यावर अनैतिक कृत्य करुन मुलीचे लैंगिक शोषण करणा-या एका नराधमाला पोलीसांनी अटक केली असून यामुळे शहर व परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सदरील आरोपीस १३ ऑक्टोबर पर्यंत म्हणजे तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
    शहाजी मधुकर राठोड (रा. घाटंग्री) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. घाटंग्री येथील एक १२ वर्षिय मुलगी उस्मानाबादेत इयत्ता सहावी मध्ये शिकत असून ती घाटंग्री येथुन उस्मानाबादला शाळेत दररोज येजा करते. शुक्रवार १० ऑक्‍टोबर रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर पिडीत मुलगी आपल्या गावी घाटंग्री येथे जाण्यासाठी शहरातील आंबेडकर पुतळा येथुन टमटमध्ये बसली होती. यावेळी टमटमध्ये शहाजी राठोड बसलेला होता. टमटममध्ये गर्दी असल्याने शहाजी राठोड या नराधमाने पिडीत मुलीस आपल्या मांडीवर बसले. यावेळी राठोड याने सदरील १२ वर्षीच्या चिमुरडीवर आंबेडकर पुतळा ते जाधववाडी येथील हनुमान चौक दरम्यान अनैतीक कृत्य करुन तिचे लैंगिक शोषण केले.
    हा याबाबत पिडीत मुलीने आपल्या आईला सांगीतल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन उस्मानाबाद शहर पोलीसात शहाजी मधुकर जाधव रा. घाटंग्री याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शहाणे हे करीत आहेत.
 
Top