उस्मानाबाद : औसा ते तुळजापूर रोडवर खंडाळा शिवारात पायी चालत येणा-या भाविकांना लुटणा-या व उबरे गव्हाण येथील खुनाच्यसा गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस मुद्देमालासह जेरबंद १२ तासात दरोडा प्रतिबंधक पथकाने गुन्हा उघडकीस आणला.
दि. ९ ऑक्टोबर रात्री करण जाधव व त्यांचा मित्र हे औसा ते तुळजापूर रोडने श्री तुळजाभवानी देवीचे दर्शनासाठी पायी चालत येत होते. खंडाळा शिवारात रोडवर तीन अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकल करुन येवून त्यांना मारहाण करुन त्याच्या हातातील ३ ग्रॅम सोन्याची अंगठी व रोख रक्कम ५ हजार ५०० असा एकूण ११ हजार ५०० रु. चा माल लुटला. या बाबत फिर्याद करण तुकाराम जाधव रा.चिंचोली ता.औसा यांनी पो.स्टे. तुळजापूर येथे दिल्याने जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
दि. १० ऑक्टोबर रोजी दरोडा प्रतिबंधक पथक हे तुळजापूर येथे नवरात्र बंदोबस्त कामी फिरत असताना मोर्डा व काक्रंबा शिवारातील काही गुन्हेगारांनी सदरचा रोड रॉबरीचा गुन्हा केला असल्याची माहिती गुप्त खब-याकडून मिळताच स्थागुशाचे पो.नि. माधव गुंडीले यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोहेकॉ मधुकर घायाळ, तानाजी माळी, मोईन काझी, संजय पानसे, नाना भोसले, सुनिल कोळेकर, प्रफुल्ल ढगे, सचिन कळसाईन चालक नज्जू पठाण यांनी दुपारी मोर्डा शिवारात सापळा रचून छापा मारुन आरोपी जयराम बब-या भोसले रा. मोर्डा यास पळून जात असताना पाठलाग करुन पकडले. त्यास विश्वासात घेवून चौकशी करता औसा ते तुळजापूर रोडवर खंडाळा शिवारात पायी चालत तुळजाभवानी दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांना त्याचे दोन साथीदारासह लुटल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील गेलेमालापैकी रोख रु. ५ हजार ५०० व गुन्ह्यात वापरलेली हीरा होंडा किंमत ३५ हजार असा एकूण ४० हजार ५०० रु. चा माल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला. सदर आरोपी हा अटल गुन्हेगार असून उमरे गव्हाण येथे दोन वर्षापुर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात फरार होता. सदर आरोपीवर यापुर्वी दरोडा, खुन, जबरीचोरी, घरफोडी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून सदर आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी पो.स्टे. तुळजापूर येथे देण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि. बुवा पो.स्टे. तुळजापूर हे करीत आहेत.