कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर रोजी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची ‘श्री आदिमाया’ रुपातील पूजा बांधण्यात आली. या पूजेत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. ‘श्री आदिमाया’ या रूपातील महालक्ष्मीची पूजा आकर्षक आणि नयनमनोहर होती.
हिंदू धर्मशात्रानुसार परब्रह्म एकच आहे. ते निर्गुण, निराकार, निश्चल आहे. सर्व उपासना या त्याच्या प्राप्तीसाठीच व सर्व उपासना ह्या त्यालाच पोहचतात, परंतु त्याची थेट उपासना करणे सर्वसामान्यांना कठीण जाते. म्हणूनच त्याला संत विद्वानांनी सगुण साकार स्वरूपात आणले. तेव्हा त्याची पुरुष आणि प्रकृती अशी फोड केली. यातील प्रकृती म्हणजेच आदिमाया होय. हे रुप सगुण असूनही साकार नाही. हिचे कोठेही मंदिर नाही. मूर्ती नाही. केवळ वेद-शास्त्रे व पुराणांतून मिळालेल्या वर्णनाच्या आधारेच ही पूजा बांधण्यात आली आहे.
ही पूजा श्रीपूजक विनय चौधरी, दत्तात्रय ठाणेकर, श्रीनिवास जोशी, अजित ठाणेकर, अमित देशपांडे, श्रीनिवास जोशी, अनिकेत अष्टेकर यांनी बांधली आहे.