उस्मानाबाद :- जिल्ह्यात मागील वर्षीच्या दुष्काळात आठही तालुक्यात विहिर-विंधन विहीर अधीग्रहणाची संख्या, टॅंकरची संख्या विचारात घेऊन जलसंधारणासाठी निधी देण्यात येईल. मात्र, कृषी व लघुपाटबंधारे विभागाने ही जलसंधारणाची कामे तात्काळ मागी लावावीत आणि ही कामे गुणवत्तापूर्ण राहतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी शुक्रवार रोजी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारण कामांच्या आढाव्यासाठी बैठक घेण्यात आली. खासदार डा. पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डा. के. एम. नागरगोजे, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी शंकर तोटावार, लघु पाटबंधारे विभागाचे (स्थानिक स्तर) कार्यकारी अभियंता कारीमुंगी आदींची यावेळी उपस्थिती होती.
चव्हाण यांनी यावेळी जलसंधारणाची कामे अद्याप सुरु झाली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी श्री. तोटावार यांनी काम करण्याबाबतचे निकष आणि मार्गदर्शक सूचना शासनाकडून आले नसल्याबाबत सांगितले.
सर्व तालुक्यात यावेळी दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे त्या-त्या तालुक्यातील विहीर-विंधन विहीर अधीग्रहणांची संख्या, टॅंकरची संख्या विचारात घेऊन जलसंधारणासाठीचा निधी वाटप करावा. कृषी व लघुपाटबंधारे विभागाने त्यांना ठरवून दिलेल्या प्रत्येकी 4 तालुक्यात ही कामे करावीत, असे चव्हाण यांच्यासह खा.डॉ. पाटील, आ. राजेनिंबाळकर व आ. चौगुले यांनी सांगितले. त्यावर सहमती होऊन कामे लवकरात लवकर सुरु करण्याची सूचना संबंधित विभागांना देण्यात आली.