उस्मानाबाद -: येथील जिल्हा रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन व जागतिक दृष्टीदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.राहूल वाघमारे, डॉ.सचिन देशमुख, डॉ. प्रदिप छंचुरे, डॉ.तानाजी माने, डॉ. महेश कानडे, डॉ.ज्योती कल्याणी-कानडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
    डॉ.कानडे यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्व सांगितले. यावेळी मानसिक आजाराबाबतची व्हि‍डीओ फिल्म रुग्ण व त्यांच्या नातेवाईक आणि प्रशिक्षण केंद्रातील परिचारिका प्रशिक्षणार्थ्यांना दाखविण्यात आली.  जागतिक दृष्टीदिनाबाबत डोळयांबाबतचे विविध आजार त्यामध्ये प्रामुख्याने मोतिबिंदू, काचबिंदू, मधुमेहामुळे डोळयांना होणारे आजार यांची कारणे व त्यावरील उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ.ज्योति कल्याणी  यांनी केले.
    यावेळी डॉ.देशमुख,डॉ.माने, डॉ.छंचुरे यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व इतर कर्मचारी उपस्थित होते. परिचारिका केंद्रातील शिक्षक व  प्रशिक्षणार्थी  यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मीरा दलभंजन यांनी केले तर सिध्दार्थ जानराव यांनी आभार मानले.
 
Top