उस्मानाबाद -: महाराष्ट्र स्वयंअर्थसहायित शाळा (स्थापना व विनिमय) अधिनियम-2012 अन्वये नवीन शाळा सुरु करण्याकरिता वा अस्तित्वात असलेल्या शाळांमध्ये दर्जावाढ करण्याकरिता शासन परिपत्रकानुसार सन 2013-14 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राप्त झालेल्या अर्जाच्या संदर्भात छाननी समितीचा प्राथमिक अहवाल (जिल्ह्यातील पात्र/अपात्र प्रस्ताव/अपात्रतेची कारणे आदि)  www.school.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
    प्राथमिक अहवाला संदर्भात ज्यांचे हरकती/आक्षेप/सूचना असतील त्यांनी छाननी समितीचे अध्यक्ष/सदस्य सचिव यांना समक्ष भेटून दि. 12 ते 21 ऑक्टोबर,2013 या पर्यंत  सायंकाळी 5 वाजेपर्यंत हरकती/आक्षेप/सूचना द्याव्यात. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती आक्षेप/सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. तसेच या समितीस मुदतवाढही देण्यात येणार नाही,असे सदस्य सचिव जिल्हा छाननी समिती तथा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
 
Top