सोलापूर :- सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत शांतता, सुरक्षितता अबाधित रहावी, समाजकंटक व गुडप्रवृत्तीचे इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे जावे म्हणून मुंबई पोलीस कायदा व सुव्यवस्था राखता यावी म्हणून जिल्ह्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी पराग सोमन यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे 37 (3) कलमान्वये पोलीस आयुक्तालय हद्द वगळून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीत दिनांक 10 ऑक्टोबर 2013 रोजी 9.00 वाजल्यापासून ते दि. 19 ऑक्टोबर 2013 रोजीच्या सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत पांच किंवा पांचाहून अधिक लोक एकत्र येण्यास बंदी घातली आहे
तसेच ज्या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक, दुय्यम पोलीस निरिक्षक यांनी पूर्व परवानगी दिली आहे. अशा यात्रास्थळे व तत्सम प्रकरणापुरता लागू होणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवा, सरकारी कामकाज बजावणा-या यंत्रणांना लागू होणार नाही.