पांगरी (गणेश गोडसे) : एक महिन्यापुर्वी निलकंठा नदीला पुर आल्यामुळे वाहुन गेलेल्या ममदापुर (ता. बार्शी) येथील पुलाची दुरूस्ती करण्यात न आल्यामुळे एक महिन्यांपासुन ममदापुरच्या दळणवळण व वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असुन गावाला एस टी बस पुर्ववत सुरू झालेली नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असुन बंद करण्यात आलेली एस टी बसची वाहतुक पुर्ववत सुरू करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ममदापुर ग्रामस्थांनी दिला आहे.प्रशासनाच्या कार्यतत्परतेचा प्रताप म्हणुन याकडे पाहिले जात आहे.
अधिक माहिती अशी की साधारण एक महिन्यांपुर्वी पांगरी परिसरात सलग पडलेल्या पावसामुळे झानपुर तलावात अतिरीक्त पाणी आले होते.जास्त क्षमतेचे पाणी सांडव्यादवारे निलकंठा नदीत आल्यामुळे ममदापुर गावाला जोडणारे बार्शी-ममदापुर व पांगरी-ममदापुर या मार्गावरील दोन्ही पुल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहुन गेले होते.कांही दिवस गावाचा संपुर्ण संपर्क तुटला होता.मात्र त्यादिवशीपासुन बार्शी आगारातर्फे या मार्गावर सोडण्यात येणा-या गोरमाळे गावच्या फे-या पुर्णताः बंद करण्यात आल्या असुन त्या अद्यापपर्यंत पुर्ववत सुरू करण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे बार्शीला व्यापार व दैनंदीन कामासाठी जाणा-या प्रवाशांचे हाल सुरू आहेत.तरी बार्शी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ या मार्गावरील बसेसच्या सर्व फे-या सुरू कराव्यात अशी या मार्गावरील अनेक गांवामधील प्रवाशी व नागरिकांची मागणी आहे.