पांगरी (गणेश गोडसे) : कडब्याची गंज का पेटवली असे विचारल्याच्या कारणावरूण चिडुन एका भावाने दुस-या भावाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ममदापुर (ता.बार्शी) शिवारात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आले. मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी भाऊ, भावजयीविरूध्द पांगरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लहु विठ्ल गायकवाड (वय 44, रा.ममदापुर, ता. बार्शी) असे मारहाणीत गंभिर जखमी झालेल्या शेतक-याचे नांव आहे. अनिल विठ्ठल गायकवाड व सुनिता अनिल गायकवाड अशी मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत. लहु गायकवाड यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपी अनिल गायकवाड यांच्या शेतात त्यांनी दिड हजार कडब्यांची गंज लावलेली होती. अनिल गायकवाड यांनी ती जाळुन टाकली. त्याचा जाब विचारण्यास लहु गायकवाड व त्यांचा मुलगा हे गेले असता त्यांना दोघांनी मिळुन मारहान करून जखमी केले. तसेच शिवीगाळ दमदाटी करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पांगरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी फरार आहेत. पुढील तपास पांगरी पोलिस करत आहेत.