शिर्डी : औरंगाबाद येथील साईभक्त मधुकर दगडूजी देशमुख यांनी साईबाबांना २१ लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण केला. साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी सदर मुकुट दान करण्यात आला.
    ईबाबांची महती सर्वदूर पोहोचली असून, आजवर बाहेरच्या राज्यातील विशेषत: दक्षिण भारतातील भक्तांची दान रुपी सुवर्ण वस्तु बाबांना अर्पण केल्या आहेत. साईबाबांनी आपल्या भक्तास भरभरुन सर्व काही दिल्याने तसेच त्यांच्या विविध चमत्कारांचे भक्तांना दर्शन घडत असल्याने भक्तांची श्रद्धा दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आजवर साईबाबांना सुवर्ण मुकुट, समई, ताट, वाटी, अगरबत्ती स्टॅन्ड, झारी, विविध प्रकारचे डागिने, सुवर्ण लॉकेट, हिर्‍याचे डागिने, सुवर्ण रूद्राक्षांच्या माळा तसेच चांदीच्या वस्तू अर्पण केल्या आहेत. औरंगाबाद येथील साईभक्त मधुकर दगडूजी देशमुख यांनी ७५६ ग्रॅम वजनाचा २0 लाख ८९ हजार ५८४ रूपयांचा सुवर्ण मुकुट बाबांच्या चरणी अर्पण केला आहे. या साईभक्ताचा संस्थानचे अध्यक्ष तथा सत्र जिल्हा न्यायाधीश जयंत कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी अजय मोरे यांच्या हस्ते देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. आपण साईबाबांचे गेल्या अनेक वर्षांपासून भक्त आहोत. साईबाबांनी आपल्या जीवनात अपेक्षा पेक्षा भरपूर काही दिल्याने बाबांनी आपल्या इच्छा पूर्ण केल्या असल्याचे या भक्ताने यावेळी सांगितले.
 
Top