कोल्हापूर : गुरुवार दि. 17 ऑक्टोबरपासून कोल्हापूर शहरात होणा-या टोल वसुली विरोधात कृती समिती आक्रमक झाली आहे. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची सोमवार रोजी बैठक पार पडली. या बैठकीत बुधवार दि. 16 ऑक्टोबर रोजी दोन मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याबरोबरच, 7 टोल नाक्यांवर मानवी भिंती उभ्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या बैठकीला जेष्ठ नेते एन.डी. पाटील, शिवसेना आमदार चंद्रदीप नरके, कॉ.गोविंद पानसरे, माजी आमदार संपतबापू पाटील उपस्थित होते.
त्यामुळे येत्या गुरूवारी म्हणजे 17 तारखेला कोल्हापूरमध्ये एक वेगळी लोकलढाई होणार आहे. सरकारने लागू केलेला टोल आणि त्याला विरोध करणारे कोल्हापूरकर यांच्यातील हा लढा आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस संरक्षणात आयआरबीची टोलवसुली सुरू होणार आहे. मात्र टोलविरोधी कृति समितीनेही आक्रमक विरोधाची तयारी केली आहे. आयआरबी कंपनीने टोलवसुलीसाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आयआरबीला टोल वसुलीसाठी पोलिस संरक्षण देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यामुळे येत्या 17 ऑक्टोबरपासून शहरात प्रवेश करणा-या वाहनांकडून टोलवसुली केली जाईल, असं पत्र आयआरबीने महापालिकेला दिलं आहे.