सोलापूर -: जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत नुकताच रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन डॉ. प्रकाश घटोळे याच्या हस्ते करण्यात आले.
    या मेळाव्यात सुमारे 150 उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्यापैकी 85 उमेदवारांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सुनिल पल्लेवार, मोरेश्वर दुधाळ, दत्तात्रय देवळे, ज्ञानेश्वर पिंगळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक संचालक रमेश हुमनाबादकर तर आभार प्रदर्शन संभाजी डगळे यांनी केले.
 
Top