तुळजापूर : आजारास कंटाळून एका महिलेने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना काळेगाव (ता. तुळजापूर) शिवारात गुरुवार रोजी तीन ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
भारताबाई पांडुरंग पांचाळ (वय 56, रा. दिंडेगाव, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. यातील भारताबाई पांचाळ यांनी आपल्या आजारास कंटाळून काळेगाव (ता. तुळजापूर) शिवारातील सुरेश सुतार यांच्या शेतातील विहीरीमध्ये गुरुवार रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पांडुरंग तुकाराम पांचाळ यांनी इटकळ पोलिसात खबर दिल्यावरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार गोविंद पवार हे करीत आहेत.