बीड (सोमनाथ खताळ) -: शिवाजी महाराज यांचे विचार मनात घेऊन संभाजी ब्रिगेडची स्थापना केली. संभाजी संभाजी ब्रिगेडचे वारे वेगाने वाहत आहे. जिल्हाध्यक्ष संतोष जाधव व शरद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजी ब्रिगेडच्या वडवणी तालुकाध्यक्षपदी सर्वसामान्ङ्म घराण्यातील तरुण संदिप माने याची निवड करण्यात आली. आपल्यावर संघटनेने टाकलेली जबाबदारी आपण पुर्ण निष्ठेने आणि मनातुन संघटनेसाठी कार्य करुण पुर्ण करु असे मत यावेळी नुतन तालुकाध्यक्ष माने यांनी बोलताना व्यक्त केले.या नियुक्तीच्या वेळी तालुक्यातील मराठा समाजासाठी झगडणारे युवा उद्योजक संतोष डावकर, जिजाऊ ब्रिगेडच्या कमल निंबाळकर, शेषेराव जगताप, दिनकर मस्के, महादेव जमाले, सरपंच दत्ता घोलप, बाळासाहेब शिंदे, सरपंच हरि पवार, राज पाटील, सरपंच माऊली सुरवसे, गणेश मस्के, आशोक शिंदे, हनुमंत शिंदे, अनिल शिंदे, श्री धपाटे, चेअरमन विलास शिंदे यांच्यासह तालु्क्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. येथील या तरुण कार्यकर्त्याची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती होताच मित्र परिवारातर्फे जल्लोषात फटाके फोडुन स्वागत करण्ङ्मात आले. यावेळी भिमा मोरे, नंदु वांडेकर, संदिप डाके, रामेश्वर शिंदे, बबलु आजबे, बाबा डांगे, सचिन आजबे, आशोक कोळपे, छगन आजबे, राजेश मोरे, सतिष आरे, धर्मराज आरे, महादेव कोकणार, शिवाजी आजबे, अमोल चाळक, कृष्णा चाळक, अरुण शिंदे, पिंटु जाधव, आत्माराम मोरे, नंदु आंबलकर, बालु खोटे, शंकर गिरी, सुरेश आजबे, सुग्रीव शेलार, श्रीराम कोळपे, अशोक माने, वैभव शिंदे, नाना जाधव, गोवींद माने यांच्यासह तालुक्यातील जिजाऊ प्रतिष्ठाण, संभाजी ब्रिगेड, यांच्यावतीने अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.