बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सोलापूर येथील नॉर्थकोट मैदानावर बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्हा युनिटच्या वतीने दि. २२ रोजी दुपारी दोन वाजता वाजता जाहीर सभा होत आहे. बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ''कही हमभुल न जाये, मला तुमच्यातील पंतप्रधान झालेला पहावयाचा आहे'' या विषयावर जाहीर सभा होत असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
बार्शीतील शासकिय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत या सभेबाबत माहिती देण्यात आली. जिल्हाध्यक्ष अँड्. संजीव सदाफुले, बसपा नेते जनार्दन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी बसपाच्या रिक्त पदांच्या जागी नेमणूक केलेल्या व्यक्तींची यादी वाचून दाखविण्यात आली. यामध्ये वैरागचे बाबासाहेब बाबर, राळेरास येथील विलास शेरखाने, भाईचारा कमिटीसाठी राळेरास येथील राहुल धोत्रे, बार्शीतील बाबासाहेब खडतरे यांचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील ८५ टक्के बहुजन समाजाला चिपळून येथे सन १९३८ साली दिलेल्या संदेशाला ७५ वर्षे झाली असून त्याची आठवण म्हणून तसेच बहुजन समाजातील तीसर्या चौथ्या पिढीतील तरुणांना माहिती करुन देण्यासाठी हा कार्यक्रम होत असल्याचे यात म्हटले आहे.