पांगरी (गणेश गोडसे) : शेतीच्या आधुनिकीकरणाबरोबरच शेतीच्या यांत्रिकीकरणातही भरीव वाढ होऊ लागली असुन अत्यंत कमी कालावधीत मशिनद्वारे जास्तीत जास्त काम उरकुन घेण्याकडे शेतक-यांचाही कल वाढला आहे. पिके मळणीच्या जुन्या व पुरातन प्रचलीतील पध्दतीतमध्ये बदल होत असतानाच शेतकरीही बाजारात येत असलेल्या नवनविन यंत्राचा आधार घेऊन आपली कामे पटापट करून घेऊ लागले आहेत.
पांगरी (ता. बार्शी, जि. सोलापूर) परिसरात यावर्षी प्रथमच परराज्यामधुन आलेल्या उच्च क्षमतेच्या हॉर्वेष्टर मशिनदवारे शेतकरी सोयाबिन उडीद आदी पिकांची मळणीची कामे करून घेन्यात गुंग आहेत. परराज्यांतुन आलेल्या मशिनदवारे अत्यल्प काळात व कमी पैशांच्या मोबदल्यात कांमे होत असल्यामुळे बहुतांश शेतकरी या मशिनला पहिली पसंती देत आहेत. ताशी 14 ते 15 पोती या मशिनद्वारे बाहेर पडत असल्यामुळे वेळेची खुप मोठी बचत होत आहे.
शेतक-यांनी या मशिनला पसंती दिल्यामुळे या भागात असलेल्या जुन्या प्रतीच्या मशिनला मात्र मागणी घटली आहे. त्यांमुळे त्या मशिनमालकाना बाहेर राज्यांमधुन आलेल्या या मशिन कर्दनकाळ ठरत आहेत. अनेकांनी यावर्षी प्रथमच लाखो रूपये खर्चुन नविन मशिन खरेदी केल्या आहेत. मात्र त्या मशिनपेक्षाही उच्च क्षमतेच्या परराज्यातील मशिन या भागात आल्यामुळे त्यांच्या अपेक्षित उत्पन्नच्या आशेवर पाणी पडले आहे.