उमरगा : उमरगा व लोहारा तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी म्हणून सिमेंट नाला बंधा-याच्या कामासाठी सुमारे २ कोटी १ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली.
उमरगा व लोहारा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील जनतेस मागील दोन वर्षापासुन भिषण दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाईस सामोरे जावे लागले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध स्थानिक लोक प्रतिनिधीच्या मागणीमुळे मुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील सिमेंट नाला बंधारे बांधणीकरीता आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतू यावेळी ज्या गावात ३१ मार्च २०१३ पूर्वी टँकरने पाणी पुरवठा होत होता त्याच गावात सिमेंट नाला बंधारे बांधण्याची अट टाकण्यात आली होती. या अनुषंगाने उमरगा व लोहारा विधानसभा मतदार संघात केवळ उमरगा तालुक्यासाठीच १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. यामुळे लोहारा तालुक्यावर अन्याय झाल्याची भावना जनमाणसात होती. तसेच लोहारा तालुक्यात दुष्काळाच्या १३८ विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. ही बाब आ. चौगुले यांनी शासनास वेळोवेळी पत्रव्यवहार करून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी ११ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती.
या बैठकीत आ. ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा तालुक्या इतकीच भिषण पाणी टंचाई लोहारा तालुक्यातही असल्याचे सभागृहात निदर्शनास आणून दिले. व एखाद्या गावात दुष्काळी तालुक्यात केवळ टँकर असणे हाच निकष ग्रहीत न धरता विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत असणे हा निकष विचारात घेणे असणेबाबत आ. चौगुले यांनी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, खा. डॉ. पद्मसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांना विनंती केली असता सिमेंट नाला बंधारे बांधणेकरीता उमरगा तालुक्याला १२७.४४ लाख रुपये व लोहारा तालुक्याला ७४.५२ लाख रूपये एवढा निधी मंजूर करण्याचा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला.