भूम : अहमदनगरहून श्री क्षेत्र तुळजापूरकडे जाणा-या श्री तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पलंगाचे ब-हाणपूर (ता. भूम) येथे शनिवार रोजी आगमन झाले. यावेळी भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पलंगाचे दर्शन घेतले.
अहमदनगर येथुन दरवर्षी घटस्थापनेदिवशी तुळजाभवानी मातेचा मानाचा पलंग नगर येथील पलंगे बंधु घेऊन जातात. घटस्थापनेदिवशी नगरहून निघालेल्या या पलंगाची शनिवार रोजी ब-हाणपूर (ता. भूम) येथे आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी तुळजाभवानी मातेच्या मानाच्या पलंगाचे दर्शन घेतले. ब-हाणपूर येथुन हा पलंग भूमकडे रवाना झाला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास भूम शहरात हा देवीचा पलंग पोहंचला. भूम येथेही नागरिकांनी या पलंगाच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दि. १३ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा मानाचा पलंग तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पोहचला.